Home क्राईम घरातून बाहेर काढले ; भाडेकरुंने केली मालकाची गळा चिरुन हत्या

घरातून बाहेर काढले ; भाडेकरुंने केली मालकाची गळा चिरुन हत्या


मुंबई (वृत्तसंस्था) घर मालकाने भाडेकरुंना घरातून बाहेर काढल्याचा राग आल्याने धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत घडलीय. तुळशीराम चव्हाण (वय 31) असे निर्घृण हत्या झालेल्या घर मालकाचे नाव आहे.

 

घर मालकाने भाडेकरुंना घरातून बाहेर काढल्याचा राग आल्याने आरोपीने दोन साथीदारांसह संगमत करुन घर मालकाची भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या समोर हत्या केली. रमेश राठोड (वय 28), संजयकुमार हिरजन (वय 25) आणि संजय पवार (वय 35) अशी अटक करण्यात आलेलल्या आरोपींची नावं आहेत. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound