याबाबतची माहिती अशी की, हर्षदा सुनील चिंचोले (वय-२५) रा. गणेशवाडी जळगाव ही तरूणी खासगी नोकरीला आहेत. त्यांच्याकडे ३० हजार रुपये किमतीचा एप्पल कंपनीचा लॅपटॉप आहे. गुरूवार १२ मे रोजी सकाळी ८ ते ८.३० या दरम्यान त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीचा मिनी लॅपटॉप चोरून नेला. त्यांनी घरातील परिसरात शोधाशोध केले परंतु लॅपटॉप कुठेही मिळाला नाही. अखेर हर्षदा चिंचोले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोनार करीत आहे.
घरातून तरूणीचा लॅपटॉप लांबविला
3 years ago
No Comments