एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील सरस्वती कॉलनी परिसरातील तरुणाने आपल्या राहत्या घराच्या वरील खोलीच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल विठ्ठल आंधळे (वय-३२) रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल असे मृत तरूणाचे नाव आहे.
एरंडोल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सरस्वती नगरात राहणारा विशाल विठ्ठल आंधळे या तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. विशाल हा एरंडोल शहराच्या प्रथम महिला माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विठ्ठल आंधळे यांचा मुलगा होता.
दरम्यान सदर घटनेची माहिती काळातच परिसरातील नागरिकांनी व मित्र परिवाराने विशाल याच्या घराजवळ प्रचंड गर्दी केली होती. विशाल हा परिसरात सर्वांसोबत मनमिळावू स्वभावाचा तरुण होता, तसेच तो सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्याच्या अशा अचानक जाण्याने शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाल याच्यावर रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले. विशालच्या पश्चात आई,वडील,लहान भाऊ,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.