नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्व महानगरांत घरगुती इण्डेन गॅसच्या दरांत थेट १५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आजपासून लागू झालीय.
इंडियन ऑईलने विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. यापूर्वी, १ जानेवारी २०२० रोजी घरगुती गॅसच्या किंमतींत वाढ घोषित करण्यात आली होती. अर्थातच, आर्थिक राजधानी मुंबईत आता विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत १४५ रुपयांची वाढ करण्यात आली. तर राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ८५८.५० रुपये मोजावे लागणार आहेत.