जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळील बसथांब्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांवर अपर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने बुधवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील जळगाव-भुसावळ रस्त्यावर असलेल्या अजिंठा चौकाजवळ असलेल्या बसथांबाजवळ जवळ दोन जण अवैधरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख, पोहेकॉ विजय सोनवणे, पोलीस नाईक इमरान शेख, पोलीस नाईक मुजफ्फर काझी, पोकॉ. गोविंदा पाटील, यांनी बुधवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता छापा टाकून कारवाई केली. यामध्ये संशयित आरोपी जावेद खान सलीम खान (वय-४२) व मोहसीन उर्फ दत्ता शेख हमीद (वय-२८) दोन्ही रा. मास्टर कॉलनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून भारत गॅसचे ७ सिलेंडर, ३ हजार ४६० रुपयांची रोकड आणि गॅस भरण्याचे साहित्य व मोटार असा एकूण २६ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जावेद खान सलीम खान व मोसिन उर्फ दत्ता शेख हमिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.