ग.स. सोसायटी निवडणुक मतदान प्रक्रीयेसाठी कर्मचारी रवाना

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतीनिधी- जिल्ह्यातील ग.स. सोसायटीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी आज दुपारी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉल मध्ये अधिकारी कर्मचाऱ्याना मतदान साहित्य वितरीत करण्यात येऊन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात सर्वात मोठी आणि सर्वात जास्त सभासद संख्या असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक गुरुवार २८ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी निर्देशित केलेल्या केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज द्पारी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉल मध्ये ग.स.सोसायटी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याना मतदान साहित्याचे वितरण करण्यात येऊन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.
या केंद्रावर होणार मतदान
जळगाव शहरात प.न.लुंकड कन्या शाळा ख्वाजा मियाजवळ, साने गुरुजी विद्यालय धुळे रोड. अमळनेर, एन.ई.एस. हायस्कूल पारोळा, पी.आर.हायस्कूल धरणगाव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल, श्री. गो.से.हायस्कूल गिरड रोड पाचोरा, सौ.सु.गि.पाटील माध्यमिक आणि सौ.जयश्री पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय भडगाव, राष्ट्रीय विद्यालय स्टेशन रोड चाळीसगाव, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, ना.ह.राका हायस्कूल बोदवड, मुन्सिपल हायस्कूल जामनेर रोड भुसावळ, जगजीवनदास इंग्लिश स्कूल-ज्यूनिअर कॉलेज मुक्ताईनगर, नूतन मराठा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल, जी.जी.हायस्कूल रावेर अशा जिल्ह्यातील १५ तालुकास्तरावर ग.स.सोसायटी मतदान केंद्रावर गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानासाठी १५ केंद्रावर ४८३ अधिकारी कर्मचारीवर्ग तैनात करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिली.

Protected Content