जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीमधील संचालकांनी केलेल्या गैरव्ययहारांची चौकशी करण्याची मागणी कास्ट्रॉईब संघटनेने केली आहे.
ग.स. सोसायटीवर आता प्राधीकृत मंडळाच्या माध्यमातून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार देखील सांभाळला आहे. याचबरोबर आता या संस्थेतील गैरव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा नोकरांच्या सहकारी पतपेढीत नोकर भरती, बिंदू नामावली, रिक्त पदांची भरती, पदोन्नतीच्या अनुषंगाने संचालकांनी केलेल्या अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.पी. केदार, बापू साळुंखे, रवींद्र तायडे यांच्या स्वाक्षर्या आहेत. संबंधित विभागाने निवेदनाची योग्य दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी कास्ट्राईब संघटनेने केली आहे.