ग्राहक सेवा केंद्र फोडून अडीच लाखांची रोकड लांबविली

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र फोडून ड्रावर मधील २ लाख ६८ हजार ९२० रुपयांचे रोकड अज्ञात २ जणांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील हिरापूररोड वरील बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र हे ज्ञानेश्वर श्रावण चौधरी यांच्या मालकीचे आहे. नेहमीप्रमाणे १० मे रोजी रात्री ८ वाजता ज्ञानेश्वर चौधरी यांनी ग्राहक सेवा केंद्राचे सेटर बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात दोन जणांनी तोंडाला मास्क लावून येऊन त्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत २  लाख ६८ हजार ९२० रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात संशयित आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या संदर्भात शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी ३ वाजता ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.

Protected Content