यावल, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील एसटी बस सेवा पूर्ववत झालेली असतांना यावल आगारातून बसेस अल्प प्रमाणत धावत असून ग्रामणी भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावल आगारातून पूर्ववत ग्रामीण भागातील सर्व मार्गांवरील बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
यावल एसटी आगारातुन ग्रामीण भागातील नागरीकांचे दळणवळणाचे मोठे साधन असलेली लालपरीची वाहतुक पुर्णपणे बंद असल्याने तालुक्यातीत ३० ते ३५ गावांचा संपर्क एसटीअभावी तुटलेला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज तालुक्यातील विविध भागातील बससेवा यावल आगारातून पूर्ववत सुरू करावी जेणे करून शहरात आपल्या विविध महत्वाच्या कामानिमित्त येणारे नागरीक आणि शैक्षणिक शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही अशा मागणीचे निवेदन आदीवासी व आदी विद्यार्थ्यांनी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक शांताराम भालेराव यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर बादल तायडे सर, मुकद्दर सिंकदर तडवी , समीर सिंकदर तडवी , कुंदन अजय पारधे , सुनिल सुरेश भालेराव , सचिन विनोद कुंभार, अक्षय किशोर पाटील , समाधान उत्तम पाटील, विक्की ज्ञानेश्वर पाटील , ऋषीकेश साहेबराव पाटील , राजेन्द्र राजेश पाटील , प्रेम ज्ञानेश्वर पाटील, अक्षय गोकुळ पाटील , निखिल पाटील , अनिकेत अशोक बिऱ्हाडे, सतिष पाटील , रुपेश पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत .