अमळनेर, गजानन पाटील | ग्रामसेवक हा गाव व शासन यांच्यातील समन्वय साधणारे पद असून या पदामुळेच गावच्या विकासाला हातभार लागत असतो असे प्रतिपादन येथील जेष्ठ पत्रकार जी. टी. टाक यांनी केले.
ते तालुक्यातील कळमसरे येथे ग्रामसेवक एस. डी. सोनवणे यांची ग्राम विस्तार अधिकारी पदोन्नती मिळाल्याने आयोजित निरोप समारंभात बोलत होते. श्री. सोनवणे यांनी कळमसरेत सन २०११ साली ग्रामसेवक पदाची जबाबदारी स्वीकारली. जवळपास १० ते १२ वर्षे एस. डी. सोनवणे यांनी अविरतपणे ग्रामसेवक पदाची योग्य प्रकारे सेवा बजावली. यानिमित्ताने कळमसरे ग्रामपंचायत व गावाच्या वतीने सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. २०११ ते २०२२ या कार्यकाळात त्यांनी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेत शासन दरबारी योग्यरित्या पाठपुरावा करून गाव विकसित करण्यावर नेहमी अग्रणी राहिलेत. त्यांच्या हीच कामाची अनोखी पध्दत पाहून गावकरी व ग्रामपंचायत यांनी ग्रामसेवक एस. डी. सोनवणे यांची करण्यात आलेली बदली शासनाकडून रद्द करून घेतली होती. त्यांचा याच कामाच्या पद्धतीने सोनवणे यांची पारोळा येथील कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच३१ मे रोजी त्यांचा सेवा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांच्या निरोप समारंभप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच उपस्थित ग्रामस्थ भावुक झालेले दिसून आले तर,गावाशी असलेली नाळ तुटणार म्हणून ग्रामविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांचेदेखील डोळे पाणावले होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/506434084494195