जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तातडीने भरावे व कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मिळावे, कोरोना काळात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एप्रिल २०२१ महिन्यापासून शासनाने पगार रखडलेलेी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकित पगार अदा करावी, किमान वेतन फरक अदा करावा, रहाणीमान भत्ता अदा करावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षणानुसार पदोन्नती मिळावी, गरजेनुसार बदली करण्यात यावी, ज्येष्ठता यादी अंतीम यादी त्वरीत प्रसिध्द करावी, कोरोना काळात मयत झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रूपयांचा विमा कवच द्यावा अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात शासनाने कोणताही निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देण्यात आला.
याप्रसंगी मनिष चव्हाण, सत्तार तडवी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सहसचिव काँम्रेड अमृत महाजन यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.