पाचोरा, प्रतिनिधी । गो. से. हायस्कूलमध्ये शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणप्रसंगी तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एस. पवार, एस. डी. पाटील, सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी, ए. जे. महाजन, पी. जे. पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर मुख्याध्यापक कार्यालयात शाळेतील शिक्षक रणजीत पाटील यांचा शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते शाळेला साडे आठ लक्ष रुपये खर्च करून रंगमंच बांधून दिल्या बद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्त शिक्षक अनिल कासार यांनी शाळेला दोन प्रवेशद्वार बांधून दिल्याबद्दल त्यांचा देखील शब्द सुमनांनी सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता सर्व प्रकारचे शासकीय नियम पाळून संपन्न करण्यात आला.