गो. से. हायस्कूलमध्ये एस.एस.सी. परीक्षेस उद्या पासुन प्रारंभ

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील श्री. गो. से. हायस्कूल मध्ये नोव्हेंबर – डिसेंबर सर्व विषयांची एस. एस. सी. परीक्षेस उद्या पासुन प्रारंभ होत असून दि. २० नोव्हेंबर पासुन ते ५ डिसेंबर पर्यंत होणाऱ्या परिक्षेत ३७५५ या केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था क्रमांक डी – ००३७९० – ते डी – ००३८५७ याप्रमाणे असेल.

परीक्षेची वेळ सकाळी १०.३० वाजता असल्याने विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत परिक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेला येतांना विद्यार्थ्यांनी फक्त पेपर सोडवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उदा. पेन, पेन्सिल, कंपास स्वतः सोबत ठेवावे. तसेच कोविड – १९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी माक्स किंवा रुमाल परिधान करून यायचे आहे. आणि प्राधान्याने स्वतः सोबत आणलेल्या बाटलीतील पिण्याचा पाण्याचा वापर करावा याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी असे आवाहन केंद्र संचालक सुधीर पाटील यांनी केले आहे. परिक्षा केंद्रावरील प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. असेही सुधीर पाटील यांनी सांगितले आहे.

Protected Content