Home क्राईम गोलाणी मार्केट परिसरातून नारळ विक्रेत्याची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा

गोलाणी मार्केट परिसरातून नारळ विक्रेत्याची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून होलसेल नारळ विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आली आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष परवेज खान सरदार खान (वय-३० ) रा. गणेश कॉलनी, जिल्हा पेठ यांचे गोलाणी मार्केटमधील दत्त मंदीराजवळ नारळाचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ एव्ही ५२०२) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे परवेज हे सकाळी ७ वाजता दुचाकीने आले. दत्त मंदीराजवळील पार्कींगच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून लावली. दुपारी ३ वाजता जेवणासाठी घरी जाण्यासाठी गेले असता दुचाकी मिळून आली नाही. सायंकाळपर्यंत दुचाकीचा शोध घेतला मिळून न आल्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परवेज यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound