जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय स्तरीय चक्रव्यूह स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, क्विझ, पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन घेतल्या गेल्या. आठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून झाली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले की कमी ज्ञान हे खूप घातक असते म्हणून आपले ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवा. पुस्तके वाचण्यावर भर द्या. कॉर्पोरेटमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देतात.
प्रमुख पाहुणे म्हणून एमएसइटीसिएल भुसावळ येथील विलास खाचणे उपस्थित होते. विध्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की पदवी झाली म्हणजे शिक्षण संपले असे करू नका तुमचे कौशल्य विकासावर भर द्या. व्यवसायासाठी तुमची असलेली आयडिया असेल तर स्टार्टअप वर भर द्या. चक्रव्यूह हे लढाई आहे आणि यामधून तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करून बाहेर निघायचे आहे. तंत्रज्ञानाची साथ सोबत ठेवून ज्ञान अद्ययावत ठेवा. यावेळी डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयाच्या डॉ नीलिमा वारके उपस्थित होत्या. स्पर्धेस परीक्षक म्हणून प्रा. योगेश रोटे, प्रा. हर्षा देशमुख यांनी बघितले.
सदर कार्यक्रमात स्पर्धकांनी पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये प्रथम पारितोषिक दिव्या सोनार या विद्यार्थिनीने तर केसीई इंजिनीरिंगचे अभिजित खैरनार याने रनर उप पारितोषिक पटकावले. पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन मध्ये गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे आदित्य पाटील याने प्रथम क्रमांक तर रनर उप वर्षा झोपे हिने पटकावले व प्रश्नोत्तरी स्पर्घेत डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयाच्या उन्नती तांबे, अनम शेख यांनी प्रथम क्रमांक, आयएमआर महाविद्यालयाचे शुभांगी चौधरी, शिवांगी शर्मा यांनी अनुक्रमे प्रथम व रनर उप पारितोषिक पटकावले.
बक्षीस वितरणासाठी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकीताई पाटील व सन्माननीय अतिथी म्हणून कविता दातार उपस्थित होत्या. यावेळी कविता दातार यांनी विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी वर मार्गदर्शन केले व अनुपयोगी apps मोबाईलमध्ये न वापरण्याचा सल्ला दिला जेणेकरून तुमचा डेटा सुरक्षित राहील. यावेळी डॉ केतकीताई पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोशनी शुक्ला यांनी व आभारप्रदर्शन डॉ. चेतन सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. आफ्रिन खान व प्रा. प्रिया फालक यांनी बघितले. सदर कार्यक्रमास विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते