जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचा ढोल- ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद, विद्यार्थ्यांनी सायंकाळी चांद्रयानाचे चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग होताच जल्लोष केला.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी या क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ढोल- ताशे वाजविण्याचा सराव सुरु केला होता. बुधवारी सायंकाळी चांद्रयान चंद्रावर उतरताच ढोलताशांचा गजर महाविद्यालयीन परिसरात झाला.. संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी याबद्दल भारतीय संशोधकांचे अभिनंदन करत नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांचे कौतुक केले.