गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात दहीहंडी उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात दहीहंडी व श्री कृष्ण जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव  महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी श्री कृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार व नारळ वाढवून कार्यक्रमास प्रारंभ करत सर्वांना कृष्णजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, दहीहंडी फोडताना टीम वर्क, सहकार्य पाहिजे. टीम वर्क म्हणजे सर्वानी एकत्रित काम करणे पण त्याच बरोबर सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. टीम वर्कमध्ये कोणाचेही महत्व कमी करता येत नाही आणि असे केले तर आपला उद्देश कधीच साध्य होत नाही म्हणूनच एकत्रित आणि समाजदारीने काम करणे महत्वाचे आहे. या कार्यक्रमामधून एकत्रित काम करणे व सहकार्य करणे हा महत्वपूर्ण संदेश देण्यात येतो आणि याचाच फायदा तुम्हाला कंपनीमध्ये होईल. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्णाचा व राधाचा वेश धारण करून वेग वेगळे नृत्य, नाट्य सादर केले. सूत्रसंचालन बी.बी.ए प्रथम वर्षामधील नेहा कचवे या विद्यार्थिनीने केले. आभार बी.सी.ए द्वितीय वर्षामधील भूमिका नाले या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. अश्विनी सोनवणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content