जळगाव, प्रतिनिधी | येथील गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एमबीए) महाविद्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑनलाईन पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एमबीए) महाविद्यालयात भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Battle of Paints या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ही रोट्रॅक्ट क्लब ऑफ गोदावरीने आयोजित केलेली होती. स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत विविध चित्रांचे रेखाटन करून दाखविण्यात आले. यामध्ये भारताच्या नकाशा, मूलभूत अधिकार , छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र सेनानी, प्रदूषण, झाडे लावा आदी चित्रांचे रेखाटन विद्यार्थ्यांनी केलेले होते. ही स्पर्धा कोरोनाचे नियम पाळून ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांचे रेखाटन केलेले चित्र बघून त्यांच्या कल्पनाशक्तीची स्तुती केली. सूत्रसंचालन रोट्रॅक्ट क्लब ऑफ गोदावरीच्या सेक्रेटरी Rtr खुशबू कांथरिया यांनी केले.