
जळगाव (प्रतिनिधी) येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आज शिवजयंती सोहळा मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. खा.डॉ. उल्हास पाटील, प्रमुख शिव व्यख्यानकर्ते प्रा.अर्जुन पाटील , प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक , कार्यक्रमाचे प्राध्यापक प्रतिनिधी व जनसंपक्र अधिकारी प्रा.देवेंद्र मराठे उपस्थित होते.
सकाळी 09.00 वाजेपासन महाविद्यालयाच्या प्रमुख प्रवेशव्दारापासुन मुलींच्या भव्य लेझीम पथकासह राजेंच्या भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्रागणात सुरुवातीला शिवपुजन मा.खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानी बोलतांना मा.खा.डॉ. उल्हास पाटील बोलत होते की,विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्दनिती करण्याची कला अवगत करुन आयुत्यातील मोठ-मोठया संकंटाना न खचता सामोरे जाऊन त्यावर मात करावी. प्रमुख वक्ते प्रा. अर्जुन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाही इतिहासावर प्रकाश टाळत बोलत होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्रमतेचे व सर्वधर्माचे स्वराज्य स्थापन केले त्यांनी कधी कुठल्या जातीच्या वधर्माचा अनादर केला नाही.
कार्यक्रमाचे सत्र संचालन ललीत इंगळे व अमृता जाधव यांनी केले. तर आभार वैभव तराले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे प्राध्यापक प्रतिनिधी देवेंद्र मराठे, ग्रंथपाल नकुल गाडगे, वैभव तराले, शुभम तिफणे,चेतन बढे, रोहित मोरे आदींनी परिक्रम घेतले.