नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात देशात २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८२ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख ४ हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या २० हजार ६४२ इतकी झाली आहे. तसेच भारतात सध्या कोरोनाचे २ लाख ६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ इतके आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.