गेंड्याची कातळी पांघरुन बैठकीला येऊ नका…

 

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत विकास कामांच्या मुद्द्यावर पुनर्वसन विभाग माहीती देत नाही म्हणुन सभापती जितु पाटील चांगलेच संतापले. गेंड्याची कातळी पांघरुन पंचायत समितीच्या मासिक बैठकीला येऊ नका.. उत्तरे द्या परंतु पुनर्वसन विभागाचे अधिकारी निरूत्तर राहीले त्यांना त्यांच्याच विभागाने केलेल्या विकास कामांची माहिती देता आली नाही.

आज रावेर पंचायत समितीची मासिक बैठक संपन्न झाली. यात पुर्नवसन विभागाचे साहाय्यक अभियंता पी. एस. इंगळे यांना पुर्नवसन संबधीत सभापती यांनी प्रश्न विचारले असता श्री. इंगळे यांना एकाही प्रश्नाची उत्तरे देता आले नाही. अशीच अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याची उडाली. तालुक्यातील रस्ते, विविध विकास कामांच्या प्रश्नावरुन सभापती श्री. पाटील चांगलेच संतापले. बैठकीला पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, प्रतिभा बोरवले, योगिता वानखेडे, कविता कोळी, धनश्री सावळे, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी उपस्थित होते. बैठकीचे कामकाज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी पाहीले.

यांची होती उपस्थिती

मासिक बैठकीला कृषी विभाग, जि.प. बांधकाम विभाग, जल संधारण विभाग, आरोग्य विभाग, एकात्मक बाल विकास प्रकल्प विभाग, शिक्षण विभाग, प. स. बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content