जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भूषण कॉलनी येथे नास्ता सेंटरच्या गॅस सिलेंडरच्या रेगुलेटरने अचानक पेट घेतल्याने दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या जवळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे येथे प्रकाश भोळे यांनी सावकारे नाष्टा सेंटर नावाचे दुकान आहे. गुरूवार ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानातील गॅस सिलेंडनच्या रेगुलेटरमधून अचानक गॅस गळती झाल्याने आग लागली. अचानक आग लागल्याने गल्लीतील नागरीकांनी धाव घेवून मिळेल तसे पाण्याचा फवारा मारण्यास सुरूवात केली. या आग विझविण्याच्या प्रयत्ना आलेल्या ज्योती विजय सावकारे व विजय सावकारे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. आगीत दुकानातील १ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काही मिनिटातच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि जळगाव महानगर पालिकेच्या अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होऊन काही मिनिटात आग आटोक्यात आणली व सिलेंडर बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान जाधव,वसंत कोळी हे फायर फायटर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.