नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडर १ मार्चपासून म्हणजेच आजपासून ५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत तब्बल सहा वेळा गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. दिल्लीत विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८०५.५० रुपये आहे. तर कोलकातामध्ये ८३९.५० रुपये, मुंबईत ७७६.५० आणि चेन्नईमध्ये ८२६ रुपये आहे. १ मार्चपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. १२ फेब्रुवारीला किमतीत वाढ झाली होती. इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास १५० रुपयांची वाढ केली होती.