अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील शारदा कॉलनी मधील बाबू गॅरेजजवळ एका मारुती ओमनी कार सुरू करत असतांना गॅस कीटच्या शॉर्टसर्कीटमुळे स्टेरिंग जवळ अचानक आग लागल्याने मोठी घटना घडली आहे. या आगीत चालक किरकोळ जखमी झाला असून कारसह बाजुला उभी असलेली रिक्षा देखील जळून खाक झाली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोपाल दिनकर सोनार (वय-४४, रा, शारदा कॉलनी बाबू गॅरेज जवळ अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी वाहन चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गोपाल सोनार यांच्या मालकीची मारुती ओमनी कार (एमएच १८ बीसी १२८९) आणि प्रवाशी रिक्षा क्रमांक (एमएच १९ एएक्स ९६५०) ही दोन्ही वाहने त्यांच्या घरासमोर लावली होती. १७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास किराणा आणण्यासाठी गोपाल सोनार यांनी कार चालू करत असताना अचानक स्टेरिंगजवळ आग लागली. त्यामुळे या आगीत गोपाल सोनार हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांनी तातडीने खाली उतरत बाजूला झाले. या आगीमुळे कारसह बाजला उभी असलेली रिक्षाने पेट घेतला. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली. गॅसकीटच्या शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गोपाल सोनार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.