मुक्ताईनगर प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज धुळे येथे जात असतांना मुक्ताईनगर येथे धावती भेट देऊन कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना आढावा घेतला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील अधिकारी यांची बैठक घेऊन कोरोना बाबतची माहिती जाणून घेतली. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे व लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, मुख्य अधिकारी विक्रम जगदाळे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.