गुलाबराव किती तास आणि कधी शुद्धीत असतात, याची माहिती घेऊन बोलू : नितेश राणे

मुंबई (वृत्तसंस्था) टीका करायला गुलाबराव दिवसातून किती तास शुद्धीत असतात. ते शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, असे प्रत्युत्तर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना दिले आहे. ना. पाटील यांनी नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नसल्याची टीका केली होती.

 

 

भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका केली होती. नाणारला ८० टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी करण्यात आला होता. त्यावर नारायण राणेंनी टीका केली होती. नारायण राणेंच्या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका केली होती. या टीकेनंतर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा, असं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, असे म्हटले आहे.

Protected Content