गुरांची अवैधरीत्या वाहतूक : दोघे फरार

रावेर, प्रतिनिधी l रावेर तालुक्यातील  गारखेडा निमड्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या गोवांशीची वाहतूक करणारे दोघे फरार झाले असून त्यांच्या विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिलेल्या फिर्यादीनुसार, गारखेडा  निमड्या गावाकडे जाणा-या रस्त्यावर रविवार १८ जुलै रोजी सकाळी २.१० मिनिटांनी सार्वजनिक जागी विनापासपरमिट गायी व गो-हे (गोवंश)कत्तलीच्या उद्देशाने घेवुन जात आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस पथक गेले असता  शेख ताजु शेख जोहर, शेख नय्युम शेख सलीम (दोघे रा. पाल ता. रावेर) हे घटनास्थळ येथून अंधाराचा फायदा घेवून फरार झालेत. यावेळी ६५ हजार किमतीचे ९ गोऱ्हे   व  ५२ हजार किमितीच्या ३ गाय व १ वासरी असे एकूण १ लाख १७ हजार किमतीचे गोवंश ताब्यात घेण्यात आले. या सर्व गायी व गोऱ्हे यांना जळगाव येथील आर सी बाफना गोशाळा येथे जमा करण्यात आले.   ही कारवाई पोनि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हे. कॉ .राजेंद्र राठोड,पो. कॉ. संदीप धनगर,पो. कॉ. दीपक ठाकूर, पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर, महेश मोगरे, पोहेकर, विकार शेख यांनी केली आहे.  पोकॉ दिपक ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल अंमलदार पोहेकॉ सतिश सानप काम पाहत आहेत. तर पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र राठोड हे करीत आहेत.

 

Protected Content