लखनऊ (वृत्तसंस्था) गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. “कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. परंतू आज विकास दुबेचे एन्काऊंटर झाल्याची बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा प्रियंका गांधींनी ट्वीट केले आहे. या ट्वीटआमध्ये गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल त्यांनी योगी सरकारला उद्देशून विचारला आहे.