जळगाव प्रतिनिधी । हाथरस येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणातील गुन्हेगारांना भर चौकात फाशी द्या, अशी मागणी मेहतर समाज व बावणी पंचायततर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
हाथरस येथील बालिकेवर १४ सप्टेंबर रोजी चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिला ठार केले होते. या नराधमांना फाशीच्या शिक्षेसाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना भर चौकात फाशी द्यावी, साक्षीदारांना संरक्षण द्यावेे, पीडितेच्या परिजनांना एक कोटी रुपये मदत देण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य वाल्मीकी मेहतर बावणी पंचायतचे महासचिव शिवचरण ढंढोरे यांनी दिले. या वेळी संदीप ढंढोरे, विलास लोट, सुभाष बेंडवाल, सुभाष सपकाळे, मनोज जयराज, आशुतोष ढंढोरे, रोहित बेंडवाल, हर्षल ढंढोरे, बंटी कंडारे, यशवंत ढंढोरे, पप्पू पवार, प्रकाश तंबोली, शेखर ढंढोरे, नीलेश डाबोरे आदी उपस्थित होते.