गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई (वृत्तसंस्था) हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नसून आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही. एवढेच नव्हे तर, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

 

 

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक तरुणीवर उपचार करत होते. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्वांनी धीर धरा. जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून पीडितेच्या हत्याऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्थिर बसणार नाही. सर्वांच्या भावनेशी मी सहमत आहे. अशा घटनेला थारा नाही आणि आरोपींना दया माया दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करू. निकाल लागल्यावर अंमलबजावणीसाठी मी उशीर होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

Protected Content