धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दि. १४ सप्टेंबर या हिंदी दिन गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी इ. १० वीची विद्यार्थिनी मनस्वी पाटील हिने प्रास्ताविकातून हिंदी दिवस का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी हिंदी भाषा, भाषेचे साहित्य, भाषेची समृद्धी याविषयी विविध काव्यरचनेबाबत माहिती दिली. यामध्ये इ. १० वीची श्रेया भावे, मनस्वी पवार, कृपा पांडे, इ. ९ वीचा कुणाल चव्हाण, इ. ८ वीचे हर्षल पाटील, रोहन पवार, अथर्व पांडे, नक्षत्रा पाटील, इ. ५ वी ची जान्हवी पाटील आदी विद्यार्थांनी हिंदी दिनाचे महत्व वर्णन केले. हिंदी विषय शिक्षिका भारती तिवारी यांनी हिंदी भाषेचे विपुल साहित्य व साहित्यिक यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन इ. १० वीची विद्यार्थीनी मनस्वी पाटील हिने केले.