Home Cities जळगाव गिरीश महाजन तातडीने मुंबईला रवाना

गिरीश महाजन तातडीने मुंबईला रवाना


जळगाव प्रतिनिधी l माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच आ. गिरीश महाजन हे तातडीने मुंबई येथे रवाना झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आज दुपारी खुद्द फडणवीस यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. आपल्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन करतानाच त्यांनी लोकांनी काळजी घेण्याचे देखील सांगितले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे विश्वासू सहकारी तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार गिरीश महाजन हे विशेष विमानाने मुंबई येथे गेले आहेत. फडणवीस यांची काळजी घेण्यासाठी ते मुंबई येथे गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound