Home क्राईम गिरड येथील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू

गिरड येथील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू


पाचोरा प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गिरड येथील तरूणाला सर्पदंश झालेल्या तरूणाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील येथील रहिवाशी प्रविण सुरेश पाटील (वय – २८) हा तरूण आज २४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्या जवळ विषारी सर्पाने चावा घेतला. प्रविण पाटील यांना मळमळ व चक्कर येवु लागले. त्यामुळे ते घरी गेले असता त्यांनी घरच्या मंडळींना सदरचा प्रकार सांगितला. प्रविण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत प्रविण पाटील यांचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. प्रविण पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.


Protected Content

Play sound