जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरात बेकादेशीर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी बुधवार २८ जून रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानराज पार्क परिसरात संशयित आरोपी नितीन शंकर फुलमाळी (वय-२८) रा. विजय नगर, जळगाव हा बेकायदेशीर हातात गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस घेवून दहशत पसरवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार २८ जून रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपीला मानराज पार्क परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि १ हजार रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी पोलीस नाईक अविनाश देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नितीन फुलमाळी यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहे.