जळगाव प्रतिनिधी । मेक्सोमाता नगरात बेकायदेशील गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर शनी पेठ पोलीसांनी कारवाई केली. शनीपेठ पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेक्सोमाता नगरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आणि अवैध गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. शनीपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी पोहेकॉ अनिल कांबळे, हकिम शेख, दिनेशसिंग पाटील यांना कारवाईच्या सुचना दिल्यात. त्यानुसार पथकाने शनिवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास पोलीसांची कारवाई करत संशयित आरोपी शांताराम पुंडलिक महाजन (वय-३२) रा. मेक्सोमाता नगर याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ९३० रूपयांची ३० लिटर गावठी दारू हस्तगत केली. पोहेकॉ अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.