Home आरोग्य गायिका कनिका कपूरची करोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह !

गायिका कनिका कपूरची करोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह !


मुंबई (वृत्तसंस्था) गायिका कनिका कपूरची दुसऱ्यांदा करोना व्हायरसची करण्यात आलेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 

कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती. परंतू दुसऱ्यांदा देखील रिपोर्ट पॉझिटिव्हच आला आहे. रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. यावेळी कनिकाच्या शरीरात करोना व्हायरसचा हाय डोस आढळला. दरम्यान, सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यापैकी ६० हून अधिक नमुने तपासले गेले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound