गाडी लावण्यावरून विक्रेत्याला दोघांनी चाकूने भोसकले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत एमआयडीसीत चहा नाश्ताची गाडी लावणाऱ्या विक्रेत्याला दोन जणांनी चाकूने भोसकून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आयोध्या नगर येथील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (वय-35) हा एमआयडीसीतील व्हि- सेक्टर येथे हेरम्स कंपनी जवळ नाश्ता तसेच चहा विक्री गाडी लावतो. त्यावर उदरनिर्वाह भागवतो. बुधवार १ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहुल रामचंद्र बराटे व गणेश अर्जुन कोळी हे दोघेही शिवनाथ शिंदे याच्या लोड गाडीजवळ आले. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याचा राग आल्याने गणेश कोळी याने शिवनाथ यास पकडून ठेवले तर राहुल रामचंद्र बऱ्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूने वार करत त्याला जखमी केले. त्यानंतर शिवनाथ शिंदे यांची गाडी पलटी करून नुकसानही केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल रामचंद्र बऱ्हाटे व गणेश अर्जुन कोळी दोन्ही रा. जळगाव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहेत

Protected Content