जळगाव प्रतिनिधी । शहरातील गवळीवाड्यात झालेल्या दगडफेकीत सहावा संशयित आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (वय-१८) रा. तांबापूरा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील गवळीवाड्यात ११ सप्टेंबर २०२० रोजीच्या मध्यरात्री रवि हटकर यांच्या घरात संशयित आरोपी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२) रा. तांबापूरा हा घुसला. त्यावेळी रवी यांच्या घरात महिला ह्या एकट्याच होत्या. त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिं बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनूसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. ताबापूरा हे सर्वजण गवळीवाड्यात चालून आले. त्यांना हटकर यांच्या घरावर दगडफेक केली. यातील भोलासिंग बावरी, जगदीशसिंग बावरी, सतकौर, यांना अटक करण्यात आली होती. तर सहावा आरोपी मोहनसिंग बावरी याला मंगळवारी २२ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.