गळफास घेत युवकाने संपवली जीवनयात्रा

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  रावेर शहरात सायंकाळी ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची  घटना आज सायंकाळी घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

रावेर शहरातील रहिवासी असलेला एका ३० वर्षीय युवकाने सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच त्याला खाली उतरवुन रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले. आत्महत्याची वार्ता रावेर शहरात वाऱ्या सारखी पसरली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली आहे.

Protected Content