शेंदूर्णी, ता.जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पाळधी गावातील शेंदूर्णी येथील आचार्य गजाननराव गरूड पतसंस्थेच्या शाखेत चैतन्यमूर्ती कै. ना.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांची ९१ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या कारकिर्दीवर मान्यवरांकडून प्रकाश झोत टाकण्यात आला. यावेळी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी विवेक शेळके यांनी बापूंच्या केलेल्या कार्याबाबत सांगितले की बापुमुळेच गरीब व सर्व सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण मिळू शकले. ईश्वर चोरडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की “तव स्मरण सतत ! स्फूर्तिदायी आम्हा घडो. बापू यांच्या फोटोकडे बगितल्या नंतर सामाजिक काम करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आम्हाला मिळते. बापूंचे कार्य अतुलनीय होते. त्यांच्यामुळे गरीब व सामान्य जनतेच्या घरासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची कवाडे खुली केली. बापूसाहेब गजाननराव गरूड यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष असताना माझ्याच शाळेत शिकलेल्या मुलाच्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा मान मिळाल्याने त्यांना आनंद वाटला होता. यावेळी कार्यक्रमाला पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक संदीप पाटील, ईश्वर चोरडिया, विवेक शेळके महेश चौधरी, रवींद्र पाटील, योगेश पाटील तसेच संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.