शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता दहावी सेमी मेडियमचा निकाल १०० टक्के तर मराठी माध्यमचा ९५.८५ टक्के लागला आहे. शाळेची विद्यार्थिनी पूर्वा श्रीकांत काबरा ही ९८ टक्के गुण मिळवून जामनेर तालुक्यात प्रथम आली आहे.
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून दहावी परीक्षेसाठी ४५८ विद्यार्थी प्रविष्ट होते. ४५८ पैकी १९७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर १५७ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. इयत्ता दहावीमध्ये पूर्वा श्रीकांत काबरा ही विद्यार्थिनी जामनेर तालुक्यातून व विद्यालयातून प्रथम आली असून हिला ९८ टक्के गुण प्राप्त झाले आहेत तर द्वितीय ऐश्वर्या हितेंद्र गरुड या विद्यार्थिनीला ९६.६० टक्के असून जामनेर तालुक्यातून व विद्यालयातून द्वितीय आली आहे. विद्यालयातून तृतीय वैष्णवी एकनाथ मिसाळ हिला ९४.४० टक्के मिळाले चतुर्थ भक्ती सुनील शेटे हिला ९३.४० टक्के गुण मिळाले. पाचवा नंबर हा लोकेश पंडित थोरात ९३.२० टक्के गुण मिळवून शाळेतून पाचवा आला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन हे संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद संस्थेचे सहसचिव दिपक गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद, संस्थेचे वस्तीगृह सचिव कैलास देशमुख यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार, उपमुख्याध्यापक ए. बी. ठोके, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.