नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे
सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करुन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असून 10 मे पर्यंत देशात 50 हजार मृत्यू होणार असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मेसेजवरही केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशाप्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.