पाचोरा प्रतिनिधि । राजकारण्यांचा वाढदिवस म्हटला की ढोल, ताशा, फटाक्यांची आतषबाजी ठरलेला कार्यक्रम पण पाचोरा-भडगाव तालुक्याला दुष्काळ असल्याने याला तिलांजली देत साध्या पद्धतीने वाढदिवस नुकताच साजरा करुन गरींबाना मदतीचा नवा पायंडा पाडला आहे.
पाचोरा शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कॉग्रेस चे आरोग्य सेवा सेल जिल्हाअध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्ते यांना केले होते. त्याच पध्दतीने कोणत्याही प्रकारची फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे न लावता हा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी राजे संभाजी युवा फांउडेशनच्या आधारवड येथे गरींबाना ब्लॅन्केट वाटप करण्यात आले. तर रात्री च्या सुमारास स्टेशन रोड परिसरातील आणि शहरातील थंडी ने कुडकुडत असलेल्या गरींबाच्या अंगावर ब्लॅन्केट पांघरूण मायेची ऊब देण्यात आली. या कार्यक्रमाचे परीसरात कौतुक होत असुन राजकीय आणि सामाजिक कार्यकर्यांना आदर्श निर्माण झाला आहे.