फैजपूर, प्रतिनिधी । येथील गणपती ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना फराळ, दिवे तसेच लहान मुलाना चॉकलेट वाटप करण्यात आले. गृपचे हे तिसरे वर्ष आहे.
फैजपूर शहरातील गणपती ग्रुप तर्फे सलग तिसऱ्या वर्षी वान्चीतांमध्ये दिवाळीचा फराळ,दराब्याचे लाडू, दिवे तसेच लहान मुलाना चॉकलेट वाटप करून तोंड गोड करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून ग्रुप तर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला फैजपूर शहराचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मिलींद वाघुळदे यांचे मार्गदर्शन लाभले. याउपक्रमात ग्रुप अध्यक्ष राजेश महाजन, रमेश सराफ, अनंत नेहेते, साजन चौधरी, विनोद कोल्हे, किरण चौधरी, किरण वाघुळदे, ललित चौधरी, नितीन किरंगे, राजु भारंबे, घारु होले, नितीन बोरोले, अविनाश चौधरी, रोहन सराफ, अज्जू बालानी यां दात्यांचे सहकार्य लाभले.