जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील माळपिंप्री येथील नरेश संजय गावंडे (वय २४) व किशोर आत्माराम पाटील हे दोघे तरुण घरगुती गणपती विसर्जनासाठी गेले असता यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार रोजी सायंकाळी घडली.
जामनेर तालुक्यातील माळपिंप्री गावाजवळ असलेल्या गाव तलावामध्ये घरगुती गणपती विसर्जन करताना सहा जणांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खोल गेले. यावेळी चार जणांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले; तर नरेश गावंडे व किशोर पाटील या दोघा तरुणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माळपिंप्री येथे दोघा तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.