गणेशोत्सवाच्या श्रेयवादासाठी सरकार धडपडतेय ; नितेश राणेंची घणाघाती टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) आम्ही लोकांमध्ये फिरत असतो. जनतेच्या समस्या आम्हाला माहीत आहेत. आम्हाला बोलावले असते तर वेगळया प्रकारची मतं सरकारला कळली असती आणि गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी त्याचा फायदाच झाला असता. दुसऱ्या कुणाचे ऐकायचे नाही, आपले म्हणणेच रेटायचे ही या सरकारची वृत्ती आहे. त्यामुळेच कोकणाचे नुकसान होत आहे, असे सांगतानाच गणेशोत्सवाच्या श्रेयवादासाठी सरकार धडपडत असल्याचा आरोप भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला.

 

 

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी नियोजन करण्यासाठी आज मंत्रालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीतून भाजपचे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना डावलण्यात आले. त्यामुळे नितेश राणे प्रचंड संतापले आहेत. नितेश राणे प्रचंड संतापले आहेत. ही लोकप्रतिनिधींची बैठक होती की शिवसेनेची असा सवाल करतानाच सरकारच्या या नियोजन शून्यतेमुळेच कोकणचे नुकसान झाले आहे. कोकणातील गणेशोत्सवा संदर्भात आज मंत्रालयात अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय आमदारांना बोलावण्यात का आले नाही? असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यावर ही लोकप्रतिनिधीची बैठक नव्हती. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती, असं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

Protected Content