गंभीर दुखापतीचे खोटे प्रमाणपत्र न देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धमकी ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सावदा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका सोबत हुज्जत घालून गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र देण्याचा दबाव आणून शासकिय कामांत अडथळा आणल्याने  तिघां विरोधात सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सावदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार,  रवी जानराव पाटील (रा. चिखली ता.मुक्ताईनगर हल्ली मुक्काम सावदा ता. रावेर),  आकाश योगेश भंगाळे  (वय १९  रा. चिनावल ता. रावेर),  चंद्रकांद्र  गोपाळ पाटील (रा. कोचुर ता. रावेर) हे तिघे सावदा पोलीस स्टेशनमधून वैद्यकीय मेमो घेवून सावदा ग्रामीण रुग्णालयात रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उपचारासाठी गेले होते. उपचार दरम्यान, या तिघांनी वैद्यकीय अधिकारी निकिता भिरूड व अधिपरिचारिका शकुंतला राजनाथ पाल यांच्या सोबत हुज्जत घालून गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र देण्याबाबत धमकाविले. तिघांनी शासकीय कामांत अडथळा आणून पोलीस कॉन्स्टेबल विनोद दामोदर यांच्याशी देखील हुज्जत घातली. याविरोधात अधिपरिचारिका शकुंतला पाल यांच्या फिर्यादीनुसार रवि पाटील, आकाश भंगाळे, चंद्रकांद्र पाटील यांच्या विरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content