जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर परिसरात इलेक्ट्रीचे काम करणाऱ्या वायमनची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, जावेद असलम मणीयार (वय-२४) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे इलेक्ट्रिक फिटींगचे काम करतात. त्यांनी खोटेनगर परिसरातील श्री रेसिडन्सी येथे राहणार पोलीस कर्मचारी गुलाब माळी यांच्या घराचे फिटींगचे काम घेतले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी कामावर आले आणि दुचाकी अपार्टमेंटच्या बेसमेंटला पार्किंगला लावली, काम करतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर होती. त्यांनी रात्री ९ वाजता काम आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. दुचाकीचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. दरम्यान, समोरील एका अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चार अज्ञात चोरटे रिक्षात आले, रिक्षातून दोन जण उतरले. दोघांनी पार्किंग झोनमधून दुचाकी लांबविली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. महेश हिलाल महाले करीत आहे.