यावल : प्रतिनिधी । कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केल्यावर देणे बाकी असलेल्या रकमेपोटी दिलेले धनादेश न वाटल्याने कायदेशीर कारवाई केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गंगून्हा दाखल करण्यात आला आहे
तालुक्यातील किनगाव बु येथील शेतकरी छगन चौधरी ( वय – ५२ वर्ष) यांच्याकडुन किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्सचे संचालक संदीप कोळी व घनःश्याम कोळी यांनी सन् २०२०च्या फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत ३६ टन कांदे किमत ६ लाख११ हजार२५९ रुपये किमतीत खरेदी केले होते त्यापैकी २ लाख ५२ हजार रुपये त्यांनी रोख दिले होते उर्वरीत रक्कम ३ लाख ६३ हजार २३९ रुपयांचे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे ३ धनादेश दिले होते मात्र संबधीतांच्या खात्यात रक्कम नसल्याने ते धनादेश बाऊंस झालेत धनादेश अनादर झाल्याबाबत संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आपणास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद छगन चौधरी यांनी दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध गु .र .न.५२ / २०२१ भादवी कलम ४२०, ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे ,करीत आहे