पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील सुमारे ४१९ रुग्णांची विविध आजाराची आरोग्य तपासणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धुळे येथील जवाहर मेडिकल, एस. सी. पी. एम. मेडिकल कॉलेज व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल (पाचोरा) यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कैलास कुमावत व नंदकिशोर युवा फाऊंडेशन खेडगाव (नंदीचे) यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, मधुकर काटे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, खेडगाव (नंदीचे) सरपंच स्वाती कैलास कुमावत, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील आदी उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरात स्त्रीरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, हृदयरोग, बालरोग, गर्भवती महिलांची तपासणी, नाक, कान, घसा रोग यासह अन्य दुखणे, व्याधी तसेच सर्व लहान – मोठे आजारावर खेडगाव गावातील व परिसरातील सुमारे ४१९ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याकामी धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ. विजय पाटील व पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. भुषण मगर यांचे मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे डॉ. सुजर काशिद, डॉ. आशिष ऊंद्रे, डॉ. श्रुती पाटील, डॉ. सुरज निकम, डॉ. मोहम्मद साकीब, डॉ. सुरज पावरा, जनसंपर्क अधिकारी जागृती बोरसे, प्रविण खरे, रुग्ण मित्र अनिल पाटील, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. उमर शेख, जितेश पाटील, डॉ. अमित खरे, डॉ. जितु भावसार यांनी सहकार्य केले. शिबीर यशस्वीतेसाठी नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर सय्यासे, लॅब टेक्निशियन सुधीर सोनकुळ, सुपरवायझर राजु महाजन, आरोग्य सेविका श्रीमती पी. एन. चौधरी (खेडगाव, नंदीचे), उपकेंद्र मदतनिस सरला पाटील, आशा स्वयंसेविका सुलभा पाटील, संगिता कोळी, आरोग्य सेवक राहुल सोनवणे यांनी कामकाज पहिले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/147816277091182